मुंबईतील रेसकोर्सच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान उभारण्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कोणतेही आश्वासन दिलेले नसल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी स्पष्ट केले. राज्यातील खरीप पिकांच्या आढावा बैठकीनंतर चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांना कोणतेही आश्वासन दिले नसल्याचे म्हटले आहे.
रेसकोर्सच्या जागेचा ९९ वर्षांचा करार ३१ मे रोजी संपुष्टात आलाय. या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान विकसित करण्याचे संकल्पना चित्र उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी प्रसिद्ध केले होते. याच संदर्भात रविवारी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली होती आणि त्यांना संकल्पना चित्र दाखविले होते. रेसकोर्सच्या कराराचे नुतनीकरण करायचे की ही जागा आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान उभारण्यासाठी मुंबई महापालिकेला द्यायची, याचा निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत.
रेसकोर्सच्या जागेवर उद्यानाबाबत मुख्यमंत्र्यांकडून कोणतेही आश्वासन नाही
मुंबईतील रेसकोर्सच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान उभारण्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कोणतेही आश्वासन दिलेले नसल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी स्पष्ट केले.
First published on: 03-06-2013 at 03:18 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not given any commitment for theme park on race course in mumbai says prithviraj chavan