मुंबईतील रेसकोर्सच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान उभारण्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कोणतेही आश्वासन दिलेले नसल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी स्पष्ट केले. राज्यातील खरीप पिकांच्या आढावा बैठकीनंतर चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांना कोणतेही आश्वासन दिले नसल्याचे म्हटले आहे.
रेसकोर्सच्या जागेचा ९९ वर्षांचा करार ३१ मे रोजी संपुष्टात आलाय. या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान विकसित करण्याचे संकल्पना चित्र उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी प्रसिद्ध केले होते. याच संदर्भात रविवारी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली होती आणि त्यांना संकल्पना चित्र दाखविले होते. रेसकोर्सच्या कराराचे नुतनीकरण करायचे की ही जागा आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान उभारण्यासाठी मुंबई महापालिकेला द्यायची, याचा निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा