स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी मी गुजराती समाजावर नाही तर, नरेंद्र मोदींच्या विकासावर टिपण्णी केली असे त्यांनी ट्विटरवरुन गुजराती समाजावर केलेल्या वादग्रस्त ट्विटवर आपले स्पष्टीकरण दीले आहे. ते आज शनिवार पत्रकार परिषदेत बोलत होते.
नितेश राणे म्हणाले, मी कोणाच्याही भावना दुखावल्या नाहीत, तसा माझा उद्देश नव्हता. राज्याविषयीच्या अभिमानामुळे ट्विटरवर वक्तव्य केले. गुजरात जर इतके प्रगतशील राज्य असेल मग गुजराती मुंबईत का? गुजरातमध्ये विकास झालेला नाही. विकासाचे खोटे स्वरुप तेथे उभारले गेले आहे. गुजरातमध्ये विकास नसल्याने गुजराती मुंबईत आहेत. असेही नितेश राणे म्हणाले.
विधिमंडळ अधिवेशनात नितेश राणे यांच्या मतांवर भाजपच्या आमदारांनी जोरदार आक्षेप घेतला होता, आणि कारवाईची मागणी केली. त्याचवेळी विधानसभा उपाध्यक्षांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश गणेश नाईक यांना दिले आहेत. नारायण राणेंचे चिरंजीव नितेश राणे आता अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. 

Story img Loader