मुंबई विद्यापीठाच्या जमनालाल बजाज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीला (जेबीआयएमएस) अन्न आणि औषध प्रशासनाकडून स्वयंपाक करण्यावर बंदी आणणारी नोटीस बजावण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी जेबीआयएमएसच्या स्वयंपाकघरात अस्वच्छता असल्याचे दिसून आले होते. त्या वेळी चौकशी केली असता स्वयंपाकघर चालविणाऱ्या कंत्राटदाराकडे परवानाच नसल्याची गंभीर बाब उघडकीस आली होती. कंत्राटदाराने अनेक नियमांचे उल्लंघन केल्याने ही नोटीस बजावली असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे साहाय्यक आयुक्त शैलेश आढाव यांनी या वेळी सांगितले.

Story img Loader