हातभट्टीच्या दारूत अधिक नशा येण्यासाठी जीवघेण्या मिथेनॉलचा वापर उघड झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आता भेसळमिश्रित ताडीकडेही लक्ष केंद्रित केले आहे. ताडीत क्लोरल हायड्रेट हे रसायन सर्रास मिसळले जात असून त्याची अधिक मात्रा आरोग्याला घातक असल्याने ताडीखोरांविरुद्ध कारवाई सुरू केली जाणार आहे.
उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त शामसुंदर शिंदे यांनी त्यास दुजोरा दिला. मोठा नफा मिळविण्यासाठी ताडीमध्येही क्लोरल हायड्रेटसारखे रसायन मिसळले जाते. या भेसळीसाठी अन्य मार्गाचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच प्रतिबंधात्मक कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात ताडीची सुमारे १२०० दुकाने आहेत. यापैकी फारच कमी दुकानांत प्रत्यक्षात ताडी विकली जाते. त्याऐवजी क्लोरेट हायड्रेटमिश्रित ताडी विकली जात आहे. या दुकानांत उत्पादन शुल्क विभागाकडून नमुने तपासलेही जातात, परंतु नमुना म्हणून नारळपाणी दिले जाते. प्रत्यक्षात क्लोरल हायड्रेटमिश्रित ताडीची तपासणीच होत नाही. मोठय़ा हप्तेबाजीमुळे आरोग्याला घातक असलेली ताडी विकली जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळेच आता ही कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
वसई-नालासोपारा आदी परिसरांत ताडीचे प्रामुख्याने उत्पादन होते, परंतु मुळात तेथे ताडीची २०-२५ झाडे असतानाही हजारो लिटर्स ताडी निर्माण कशी होते, हा प्रश्न आहे.
आता भेसळयुक्त ताडी रडारवर!
हातभट्टीच्या दारूत अधिक नशा येण्यासाठी जीवघेण्या मिथेनॉलचा वापर उघड झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आता भेसळमिश्रित ताडीकडेही लक्ष केंद्रित केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-06-2015 at 05:15 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now adulterated toddy on police radar