बाहेरगावी जाणाऱ्या गाडय़ांच्या तिकिटांचे आरक्षण आता मोबाईलवरून एसएमएसद्वारे करण्याची सुविधा ‘आयआरसीटीसी’ने उपलब्ध करून दिली आहे. प्रवाशांना आणखी  सुविधा देण्यासाठी मोबाइलवरून तिकीट आरक्षण ही संकल्पना आणल्याचे आयआरसीटीसीतर्फे सांगण्यात आले. या नव्या सुविधेमुळे रांगेत उभे राहण्याचा प्रवाशांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत. ‘एसएमएस’द्वारे तिकीट आरक्षित करण्यासाठी संबंधित बँकेत आणि आयआरसीटीसी या दोन्ही ठिकाणी मोबाइल क्रमांक नोंदवणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या मोबाइलवर ‘आयआरसीटीसीमोबाइल’हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करावे. त्यानंतर ‘आयआरसीटीसी’कडून एसएमएसद्वारे मोबाइल नंबर मिळेल. बँकेकडून ‘मोबाइल मनी आयडेंटीफायर’ आणि ‘वन टाइम पासवर्ड’ मिळाल्यानंतर ‘आयआरसीटीसी’ने पाठवलेल्या नंबरवर मेल किंवा एक्सप्रेस क्रमांक, प्रवासाचे ठिकाण-वेळ, दर्जा, प्रवाशांचे नाव पाठवायचे. त्यानंतर ‘आयआरसीटीसी’कडून ट्रान्झ्ॉक्शन आयडी मिळेल व बँकेतून पैसे वळते झाल्यावर तिकीट मिळेल.

Story img Loader