पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून देण्यात येणारे ‘सुगंधी दूध’ त्यांना वारंवार बाधल्याच्या घटना घडल्यामुळे ते कायमचे बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याऐवजी आता विद्यार्थ्यांना चिक्की देण्यात येणार आहे. आगामी शैक्षणिक वर्षांपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
पालिकेच्या शाळांमधील गळती रोखण्यासाठी आणि पोषण आहार म्हणून विद्यार्थ्यांना सुगंधी दूध योजना सुरू करण्यात आली होती. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना सुगंधी दूध अनेकदा बाधल्यामुळे अधूनमधून त्याचा पुरवठा बंद करण्यात आला होता. दुधाची बाधा होत असल्याने पोषण आहार म्हणून विद्यार्थ्यांना काय द्यायचे याचा विचार करण्यासाठी पालिका रुग्णालयांच्या वैद्यकीय वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. सुहासिनी नागदा यांची एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती. डॉ. नागदा यांनी प्रशासनाला सादर केलेल्या अहवालात विद्यार्थ्यांना चिक्की द्यावी, असे सुचविले आहे.
विद्यार्थ्यांना राजगिऱ्याची की शेंगदाण्याची चिक्की द्यायची, ती किती प्रमाणात द्यायची याबाबत मात्र अद्याप विचार झालेला नाही. येत्य महिन्याभरात त्याबाबत निर्णय घेण्यात येणार असून आगामी शैक्षणिक वर्षांमध्ये त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा