अमेरिकेत हल्दीरामच्या खाद्यपदार्थांत कीटकनाशकाचे प्रमाण अधिक आढळून आल्याने हल्दीराम कंपनीच्या उत्पादनांची तपासणी करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाच्या राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी दिले आहेत.
अमेरिकेत हल्दीरामच्या खाद्यपदार्थांत कीटकनाशकाचे प्रमाण अधिक आढळल्याने त्यावर बंदी घालण्यात आली असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्यातही हल्दीराम कंपनीच्या खाद्यपदार्थांची तपासणी करून ते खाण्यास योग्य आहेत का, याची तपासणी करावी आणि त्यात काही दोष असतील तर कठोर कारवाई करावी, अशा सूचना विद्या ठाकूर यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांना दिल्या आहेत.
मॅगी नूडल्समध्ये शिसे आणि एमएसजी यांचे प्रमाण अधिक आढळल्याने केंद्र सरकारने या उत्पादनाच्या विक्रीवर देशभरात बंदी घातली आहे. त्यानंतर आता हल्दीरामचे पदार्थही तपासणीच्या कचाट्यात सापडले आहेत. त्याच्या तपासणीमध्ये काय आढळते, यावर पुढील कारवाई निश्चित केली जाईल.