सहाय्यक पोलीस आयुक्त वसतं ढोबळे यांनी फेरीवाल्याविरुद्ध केलेल्या कारवाई दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या मदन जैस्वाल यांच्या मुलीचाही रविवारी केईएम रुग्णालयात जंतुसंसर्गामुळे मृत्यू झाला.
कारवाई सुरू असताना पळणाऱ्या जैस्वालचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाला होता. यांच्या मृत्युनंतर त्यांचे कुटुंबिय वाराणसीहून आले होते. मुंबईत येण्याआधीपासून त्यांची २२ वर्षांची मुलगी राधा आजारी होती. तिच्यावर अंधेरीतील व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्याने तिला अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.  प्रकृती अधिक खालावल्याने तिला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा