दहशतवादी कारवायांमध्ये सर्वाधिक तरूण १८ ते २१ वर्षे वयोगटातील आढळतात. अशा तरुणांना महाविद्यालयात असतानाच ‘जिहाद’च्या नावाखाली भडकवले जाते. त्यांना चुकीचा ‘जिहाद’ शिकविला जातो. त्यामुळे महाविद्यालय आणि शाळा तसेच या वयोगटातील तरुणांना एकत्रित आणण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी ‘मिशन मृत्युंजय’ ही योजना सुरू केली होती. त्याचाच एक भाग म्हणून आता प्रत्येक महाविद्यालयात ‘मिशन मृत्युंजय क्लब’ स्थापन केला जाणार आहे. संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकारी या तरुणांशी सतत संपर्कात राहावे, हा या क्लब स्थापनेचा हेतू आहे. षण्मुखानंद सभागृहात महाविद्यालयीन युवकांच्या उपस्थितीत या क्लबची स्थापना आयुक्तांनी केली. विद्यार्थ्यांसमोर भाषण न करता खेळीमेळीच्या वातावरणात डॉ. सिंग यांनी संवाद साधला. मिशन मृत्यूंजय म्हणजे काय हे समजावून सांगत त्यांनी त्याचे महत्त्व पटवून दिले. अज्ञान दूर करणे, आसपासच्या घडामोडींविषयी सतर्क राहणे या मूलभूत बाबी असल्याचे त्यांनी सांगितले. १९९२ च्या दंगलीच्या वेळी जकात नाक्यांमार्फत शस्त्रास्त्रे मुंबईत आली. सामानाची तपासणी न करण्याचा भ्रष्टाचार आजही सुरू आहे. कुणालाही एजंटमार्फत बनावट शिधापत्रिका, वाहनपरवाना, निवडणूक ओळखपत्र आणि पॅन कार्ड उपलब्ध करून दिले जाते. नशेबाज लोकांचा अतिरेकी कारवायांसाठी वापर होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. मुंबई पोलीस दलात ३० टक्के महिला पोलीस घेण्यासाठी प्रक्रिया सुरू असून येत्या काही वर्षांत टप्प्याटप्प्याने महिला पोलीस मोठय़ा संख्येने दिसतील, असे आयुक्त म्हणाले. या महिलांना महत्त्वाची जबाबदारीही दिली जाईल, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमात सहपोलीस आयुक्त (गुन्हे) हिमांशू रॉय, सहपोलीस आयुक्त (वाहतूक) विवेक फणसळकर आणि सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सदानंद दाते तसेच राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन सचिव आय. झेड. कुंदन आदींनी मार्गदर्शन केले.
आता महाविद्यालयात ‘मिशन मृत्युंजय क्लब’
दहशतवादी कारवायांमध्ये सर्वाधिक तरूण १८ ते २१ वर्षे वयोगटातील आढळतात. अशा तरुणांना महाविद्यालयात असतानाच ‘जिहाद’च्या नावाखाली भडकवले जाते. त्यांना चुकीचा ‘जिहाद’ शिकविला जातो. त्यामुळे महाविद्यालय आणि शाळा तसेच या वयोगटातील तरुणांना एकत्रित आणण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी ‘मिशन मृत्युंजय’ ही योजना सुरू केली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-01-2013 at 03:28 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now mission mrutyunjay club in college