अजमल कसाब आर्थर रोड कारागृहात आल्यापासून कारागृहाच्या मागील धोबीघाटकडे जाणारा रस्ता सुरक्षेच्या कारणामुळे बंद करण्यात आला होता. गेली चार वर्ष हा रस्ता वाहनांसाठी बंद होता. कसाबला फाशी दिली, आता तरी येथील रस्ता खुला होईल का असा प्रश्न येथील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
येथील रहिवाशांना सकाळी टीव्हीवरून कसाबला फाशी दिल्याची बातमी समजली. त्यामुळे आश्चर्य आणि आनंदाच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. धोबीघाटाचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. वाहनांना बराच मोठा वळसा घालून जावे लागत होते. आता तरी हा रस्ता मोकळा होईल असा आशावाद रहिवाशांनी व्यक्त केला.

Story img Loader