आतापर्यंत तीन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने पार पडलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक उपराजधानीत अद्याप नाटय़ संमेलन का नाही, असा सवाल नाटय़ परिषदेच्या ठाण्यातील सभासदांनी निवडणूक प्रचारासाठी आलेल्या उत्स्फूर्त पॅनेलचे उमेदवार अभिनेते मोहन जोशी यांनी केला.
जोशी यांनी शुक्रवारी परिषदेच्या ठाणे शाखेस भेट दिली. नाटय़ परिषदेच्या निवडणुकीत राजकीय प्रवृत्ती शिरल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. विरोधकांनी आपल्यावर केलेले सर्व आरोप निराधार असून त्यांच्या भूलथापांना कुणीही बळी पडू नये, असे आवाहनही यांनी मतदारांना केले. परिषदेच्या ठाणे शाखेचे अध्यक्ष आमदार राजन विचारे, कार्याध्यक्ष विद्याधर ठाणेकर, आशा जोशी, दुर्गेश आकेरकर, मृदुला मराठे, सुरेखा मोणकर, मच्छिंद्र पाचकर आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

Story img Loader