शालेय शिक्षण विभागाने स्कूल बससाठी सुधारित नियमावली जाहीर केली असून प्रत्येक स्कूल बसमध्ये महिला परिचर, मुलांचा विमा उतरविणे, वाहनचालकाची दरवर्षी वैद्यकीय तपासणी सक्तीची करण्यात आली आहे. बसमध्ये संगीत वाजविण्यास आणि बसमधील कोणत्याही कर्मचाऱ्यास मद्यपान व धूम्रपान करण्यासही मनाई करण्यात आली आहे.
स्कूल बससाठी याआधीही सरकारने नियमावली लागू केली होती, मात्र त्यातील काही मुद्दय़ांमध्ये सुधारणा करीत ही नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. शाळेच्या प्राचार्याच्या अध्यक्षतेखाली परिवहन समिती नेमली जावी आणि त्यात वाहतूक किंवा पोलीस निरीक्षक, मोटर वाहन निरीक्षक, बस कंत्राटदार प्रतिनिधी, शिक्षक-पालक सभेचा प्रतिनिधी यांचा समावेश असावा. दर सहा महिन्याने समितीची बैठक होऊन बसथांबे, शुल्क, वाहन आणि मुलांची सुरक्षितता आदी मुद्दय़ांवर निर्णय घेतले जावेत. बसमध्ये प्रथमोपचार, अग्निशमन यंत्र उपलब्ध असेल आणि वर्षांतून दोन वेळा त्याची चाचणी घेण्याची जबाबदारी शाळेच्या प्राधिकाऱ्यांवर असेल. बसमध्ये कंत्राटदाराने महिला व पुरुष परिचर, स्वच्छक यांची नियुक्ती करून त्यांना ओळखपत्र व गणवेश द्यावेत. प्रत्येक विद्यार्थ्यांचा रक्तगट आणि आणीबाणीच्या परिस्थितीतील संपर्क क्रमांक हा तपशील बसमध्ये असला पाहिजे, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नियमावलीतील महत्त्वाच्या सूचना
* मुलांचा विमा पालकांनी काढावा. वाहनाचा विमा बसमालकाकडून
* बस कर्मचाऱ्यांनी मुलांना कोणतेही खाद्यपदार्थ किंवा पेय देऊ नये
* बस चालू असताना दरवाजे बंद ठेवावेत. कंत्राटदाराने बसमध्ये डास व कीटकनाशक फवारणी, स्वच्छता करून एअर फ्रेशनर पुरवावे
* मुलांना ठरलेल्या ठिकाणी अधिकृत व्यक्तींच्याच ताब्यात सोपवावे
* सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किंवा विशिष्ट कारणांखेरीज अन्य वाहनाने येणाऱ्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त सर्वाना स्कूलबस सक्तीची. (काही अपवाद वगळता)