बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) तत्वाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या रस्ते विकास प्रकल्पांमध्ये दुचाकी आणि रिक्षा यांना टोल न लावण्याच्या आपल्याच निर्णयाला बगल देत मुंबईत रिक्षा आणि दुचाकीलाही टोल लावण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरातील जे लोक आरे वसाहतीमधून जाणाऱ्या रस्त्याचा वापर करतील त्यांना मोटर सायकलसाठी एकेरी फेरीसाठी ५ रुपये तर रिक्षाला १० रुपये टोल दयावा लागणार आहे.
आरे वसाहतीमधून जाणारा दिनकरराव देसाई मार्ग हा मुख्य रस्ता गोरेगाव चेक नाक्याजवळ पश्चिम द्रुतगती मार्गावरील जंक्शनपासून सुरू होऊन तो पवई चेक नाका आणि मरोळ चेक नाका येथे महापालिकेच्या रस्त्यांना मिळतो. सुमारे ७.३० किमी लांबाचा हा रस्ता पूर्व आणि पश्चिम उपनगरातील वाहनधारकांसाठी फारच उपयुक्त असल्यामुळे त्याचा मोठय़ा प्रमाणात वापर होतो. मात्र सध्या या रस्त्याची दुर्दशा झाली असून त्याची वारंवार दुरूती करणे आर्थिक दृष्टय़ा परवडत नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत सार्वजनिक बांधकाम विभागाने बीओटी तत्वावर या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आरे कॉलनीतील या मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. सुमारे १३४.५३ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी १६ वर्ष टोल आकारण्यात येणार असून सदर प्रकल्प १८ माहिन्यात पूर्ण करण्याचे बंधन ठेकेदारावर घालण्यात येणार आहे. तसेच रात्री १२ ते सकाळी ४ वाजता या दरम्यान केवळ आरे वसाहतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना तसेच शासकीय कर्मचारी आणि ओळखपत्र धारकांशिवाय अन्य लोकांना वाहतूकीस बंदी करण्यात येणार आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या मार्गावरून मोठय़ा प्रमाणात रिक्षा आणि मोटर सायकल जात असल्यामुळे त्यांच्यावरही टोल लावणयाचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार स्कुटर व मोटर सायकलसाठी पाच रूपये, रिक्षासाठी १० रूपये कार व जीपसाठी २५ रूपये, मिनी बस आणि टेम्पोसाठी ४५ रूपये तर बसेससाठी ९० रूपये तर ट्रकसाठी १८० रूपये एकेरी टोल आकारला जाणार आहे. तसेच त्यात दर तीन वर्षांनी बदल होणार आहे.
आता मोटर सायकल, रिक्षावरही ‘टोलधाड’
बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) तत्वाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या रस्ते विकास प्रकल्पांमध्ये दुचाकी आणि रिक्षा यांना टोल न लावण्याच्या आपल्याच निर्णयाला बगल देत मुंबईत रिक्षा आणि दुचाकीलाही टोल लावण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरातील जे लोक आरे वसाहतीमधून जाणाऱ्या रस्त्याचा वापर करतील त्यांना मोटर सायकलसाठी एकेरी फेरीसाठी ५ रुपये तर रिक्षाला १० रुपये टोल दयावा लागणार आहे.
First published on: 23-03-2013 at 02:52 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now toll tax on two wheelar and three wheelar