ठाणे : मध्य रेल्वेच्या उपनगरीय प्रवासात गेली काही वर्षे अपंगांच्या डब्यात प्रवास करण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या तीन वर्षांत ठाणे रेल्वे स्थानकात ९,३६२ प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई केली. सर्वाधिक कारवाई १ जानेवारी ते १३ डिसेंबर या कालावधीत झाली. या प्रवाशांची संख्या ३,८७० इतकी आहे. तरीही अपंगांच्या डब्यातील प्रवास कमी होत नसल्याचे चित्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अपंगांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी उपनगरीय रेल्वेगाड्यांत अपंगांना डबा आरक्षित केलेला असतो. परंतु, या डब्यांत धडधाकट प्रवाशांची घुसखोरी वाढली आहे. रात्री आणि सकाळच्या वेळेत प्रवास करताना नोकरदारांची उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये गर्दी होत असते. ती टाळण्यासाठी प्रवासी थेट अपंग डब्यांत घुसखोरी करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेकदा हे प्रवासी अपंगांच्या आसनांवर बसलेले असतात.

हेही वाचा…लोक अदालतीमुळे १७ कोटींचा दंड वसूल, विशेष मोहिमेत १,८३१ वाहनांविरोधात कारवाई

२०२२ ते २०२४ या कालावधीत ९,३६२ प्रवाशांवर कारवाई करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. ठाणे स्थानकात २०२२ मध्ये २,५१५ प्रवाशांवर कारवाई झाली. तर २०२३ या वर्षी २,९७७ प्रवाशांवर कारवाई झाली आहे. सर्वाधिक कारवाई १ जानेवारी ते १३ डिसेंबर २०२४ या कालावधीत ३,८७० प्रवाशांवर कारवाई झाली. या वर्षी १ जानेवारी ते ३० जून या कालावधीत २,०६१ प्रवाशांवर, तर १ जुलै ते १३ डिसेंबर या कालावधीत १,८०९ प्रवाशांवर कारवाई झाली.

हेही वाचा…पोयसर नदीच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक परवानग्या प्राप्त, तब्बल दोन वर्षांनी प्रकल्पाला वेग येण्याची शक्यता

प्रवाशांनी अपंगांच्या डब्यात प्रवेश करून प्रवास करू नये. अन्यथा त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल. अपंगांच्या डब्यात घुसखोरी रोखण्यासाठी आम्ही अभियानही सुरू केले आहे. सुरेंद्र कुमार कोस्टा, निरीक्षक, रेल्वे सुरक्षा दल, ठाणे स्थानक.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Number of disabled coaches in central railways suburban journeys has increased in recent years mumbai print news sud 02