लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्राबाहेर लागलेल्या रांगा लक्षात घेऊन विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक मतदान केंद्रामध्ये (बूथ) पूर्वी असणारी सरासरी १५०० मतदारांची संख्या आता सरासरी १००० ते १२०० इतकी असेल. त्यामुळे मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदानाचे प्रमाण व वेग वाढण्यास मदत होणार आहे. तसेच मतदारांची संख्या व परिसर यांचा ताळमेळ घालून मतदान केंद्रांचे नियोजन करण्यात येणार आहे.

13-year-old girl molested by father while mother was drunk
मुंबई : आई मद्यधुंद अवस्थेत असताना पित्याकडून १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार
11th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
११ सप्टेंबर पंचांग : प्रीती योग कोणाच्या नशिबाचे उघडणार कुलूप? व्यवसायात लाभ तर मान-सन्मानात होईल वाढ; वाचा तुमचे भविष्य
Atal Setu Viral Video
Atal Setu Viral Video : अटल सेतूवर थरार; रेलिंगच्या पलिकडे उतरलेल्या महिलेला पोलिसांनी वाचवलं, जबानीत म्हणाली, “मी तर…”
Mumbai Ac Local Crime News
Mumbai Local : दंड मागितल्याने टीसीला मारहाण; शर्ट फाडला, बुक्के मारले आणि.., विरार एसी लोकलमधला व्हिडीओ व्हायरल
Abhishek Bachchan reacts on divorce rumors with Aishwarya Rai
ऐश्वर्या रायपासून घटस्फोट घेण्याच्या चर्चांवर अखेर अभिषेक बच्चनने सोडलं मौन; म्हणाला…
Rajiv Kumar on Maharashtra Assembly Election Date Schedule in Marathi
Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाच्या आयुक्तांचं मोठं विधान, म्हणाले…
Female Doctor Suicide
Doctor Suicide : “डिअर अहो, बाय! मी मेल्यावर…” सात पानी पत्र लिहून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पतीच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल
revised pension to maharashtra government employees proposal in state cabinet meeting today
कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्तिवेतन; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज प्रस्ताव

विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सध्या राज्यात मतदार यादी अद्ययावत करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. मुंबईसाठी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत मुंबई महानगरपालिका मुख्यालयात शुक्रवारी महापालिका आयुक्तांनी बैठक घेतली. मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या कार्यक्रमाची जनजागृती करण्यात आली आहे. त्यासोबत राजकीय पक्षांनीही आपापल्या परीने या कार्यक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी, जेणेकरुन मतदार नोंदणीचे पर्यायाने मतदानाचे प्रमाण वाढवण्यास मदत होईल, असे आवाहन भूषण गगराणी यांनी केले.

आणखी वाचा-उत्सवादरम्यान लेझर आणि कर्णकर्कश डीजेच्या वापरास आव्हान, उच्च न्यायालयात जनहित याचिका

जिल्हा निवडणूक अधिकारी या नात्याने भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या आढावा बैठकीमध्ये विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले होते. अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, तसेच महानगरपालिकेचे सहआयुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) विजय बालमवार व संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

सध्या सुरू असलेला मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम २० ऑगस्टपर्यंत राबविण्यात येणार आहे. त्यानंतर ३० ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. नवमतदारांची नोंदणी, मतदारांच्या नावासमवेत मोबाइल क्रमांक जोडणे इत्यादी प्रक्रियांची माहिती या बैठकीत देण्यात आली. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी त्यावर आपापली मते व सूचना मांडल्या.

आणखी वाचा-मुंबई: ‘एमएमआरडीए’, ‘एमएसआरडीसी’वर जबाबदारी; ५१,५१७ झोपड्यांचे पुनर्वसन

गगराणी म्हणाले की, महानगरपालिका क्षेत्रातील अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचतानाच मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी यंत्रणांच्या प्रयत्नांना राजकीय पक्षांनीही आपापल्या परीने सहकार्य करण्याची गरज आहे. मतदारांना अधिकाधिक सुलभ पद्धतीने मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी यंत्रणेसोबतच राजकीय पक्षांनीही एकत्रित प्रयत्न करावेत. सध्या मुंबई महानगरात मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाची पूर्ण क्षमतेने अंमलबजावणी करण्यात यावी, जेणेकरून अधिकाधिक मतदार नोंदवले जातील, अशी सूचना गगराणी यांनी केली.

मतदान केंद्राच्या सूसुत्रीकरणाची सुधारित माहिती करून देण्यासाठी निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसिद्धी प्रक्रिया सुरू झाली आहे. मतदान केंद्रांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी ‘Know your polling station‘ हे जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली.

आणखी वाचा-राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत राज्यात दोन वर्षांत ७,१७३ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया! दरवर्षी २ कोटी मुलांची होते आरोग्य तपासणी…

लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्रांच्या बाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी अतिरिक्त वेळ द्यावा लागला. त्यामुळे पहाटेपासून आलेले निवडणूक कर्मचारी दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत रखडले होते. तसेच मतदारांनाही प्रचंड उकाड्यात ताटकळावे लागले होते. त्यावरून खूप टीका झाली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्रांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बैठकीला राजकीय पक्षांची पाठ?

या बैठकीला शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार राहुल शेवाळे, माजी आमदार मनिषा कायंदे उपस्थित होते. या बैठकीकडे इतर सर्व पक्षांनी पाठ फिरवल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान, महापालिका प्रशासनाने सर्व राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये या बैठकीचे निमंत्रण पाठवले होते, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.