२५ डिसेंबरला नागपूरमध्ये बौद्ध धम्म स्वीकार कार्यक्रम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राज्यातील विविध फुले-आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने साजरा केल्या जाणाऱ्या २५ डिसेंबर या ‘मनुस्मृती दहनदिनी’ इतर मागासवर्गीय समाजातील (ओबीसी) अनेक जातींमधील सुमारे ३०० हून अधिक कुटुंबे हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माचा स्वीकार करणार आहेत. नागपूर येथे होणाऱ्या या समारंभात धर्मातर करून बौद्ध धम्माची दीक्षा घेणाऱ्या ओबीसी कुटुंबांची संख्या आणखी वाढणार आहे, अशी माहिती सत्यशोधक ओबीसी परिषदेच्या वतीने देण्यात आली.

ओबीसी समाजाचे नेते हनुमंत उपरे यांनी १४ ऑक्टोबर २०११ रोजी ओबीसींच्या उन्नतीसाठी धर्मातराशिवाय पर्याय नाही, अशी भूमिका मांडून पाच वर्षांनंतर म्हणजे डॉ. आंबेडकरप्रणीत धम्मक्रांतीच्या ६० व्या वर्षी मोठय़ा संख्येने ओबीसी समाज धर्मातर करून बौद्ध धम्माचा स्वीकार करेल, हे जाहीर केले होते. त्या दिवसापासून त्यांनी इतर मागासवर्गीयांमधील विविध जातींमध्ये धर्मातरासाठी जनजागृती घडवून आणण्याकरिता ‘चलो बुद्ध के ओर’ असे अभियान सुरू केले.   परंतु गेल्या वर्षी  त्यांचे आकस्मिक निधन झाल्याने  ही चळवळ  थंडावली होती. गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे कुटुंबीय व सहकाऱ्यांनी या अभियानाला गती  दिली.

याच वर्षांत ओबीसींचे धर्मातर घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. मात्र १४ ऑक्टोबरऐवजी राज्यात विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने मनुस्मृतीदहन दिन साजरा केला जातो, त्या दिवशी, २५ डिसेंबरला हा समारंभ घ्यायचे ठरले. त्यानुसार धर्मातर करणाऱ्या व बौद्ध धम्माची दीक्षा घेणाऱ्यांची जिल्हावार नोंदणी करण्यात आली.

आतापर्यंत तीनशेहून अधिक ओबीसी कुटुंबांनी संयोजकांकडे नाव नोंदणी केली असल्याची माहिती ओबीसी परिषदेचे अध्यक्ष संदीप उपरे यांनी दिली. त्यात कुणबी, बंजारा, भावसार, माळी, साळी, कोष्टी, गुरव, कुंभार, नाभिक, आगरी, इत्यादी जातींचा समावेश आहे. तर, अनेक ओबीसी कुटुंबांकडून दूरध्वनीवरून या कायक्रमाला पाठिंबा देण्यात येत आहे. त्यानुसार प्रत्यक्ष समारंभाच्या वेळी धर्मातर करून बौद्ध धम्माची दीक्षा घेणाऱ्या कुटुंबांची संख्या वाढू शकते, असा त्यांचा दावा आहे.