मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत असलेली जकात बंद करण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. मग महापालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या सेवा-सुविधांचा खर्च राज्य सरकार उचलणार का, असा सवाल करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी जकात रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाला ठाम विरोध केला.
महापालिकेच्या टो. रा. वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई य. ल. नायर धर्मार्थ रुग्णालयातील कर्करोग औषधोपचार (केमोथेरपी) विभागाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. महापौर सुनील प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या समारंभास खासदार अनिल देसाई, स्थायी समिती अध्क्ष राहुल शेवाळे, पालिका आयुक्त सीताराम कुंटे, अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर, सभागृह नेते यशोधर फणसे आदी मान्यवर उपस्थित होते.
महागाईचा भस्मासूर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जगायचे कसे असा प्रश्न जनतेला पडला आहे. अशा परिस्थितीतही महापालिकेकडून जनतेला अनेक सेवा-सुविधा पुरविण्यात येत आहेत. त्यांचा खर्च जकात आणि उत्पन्नाच्या अन्य स्रोतांतून भागविण्यात येत आहे. आता जकात बंद करून पालिकेचे पंखच कापण्याचा घाट सरकारने घातला आहे. उत्पन्नाचा स्रोत बंद झाला तर सुविधा पुरवायच्या कशा? पालिकेचे उत्पन्न घटले तर त्याची जबाबदारी सरकार घेणार का? असे सवाल उपस्थित करून उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्य सरकार पालिकेला विश्वासात न घेताच आंधळेपणाने धोरण आखत आहे. त्याचे प्रतिकूल परिणाम थेट जनतेला भोगावे लागणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा