गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत गर्दीत तरूणीच्या विनयभंग प्रकरणात तीन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत हा किळसवाणा प्रकार घडला. टेलिव्हीजन आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी या तीन अज्ञातांविरोधात काळाचौकी पोलीस ठाण्यात कलम ३५४,१(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर आरोपी दिसल्यास त्याची त्वरित माहिती देण्याचे आवाहन ही पोलिसांनी केले आहे. पोलिसांनीही छायाचित्रांच्या मदतीने या तीन अज्ञातांचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे.
(छाया: ‘मिड डे’ वृत्तपत्र छायाचित्रकार)