मुंबई : ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथून घारापुरीकडे निघालेल्या प्रवासी बोटीच्या अपघातातील मृतांची संख्या १४ झाली असून गुरूवारी अपघातग्रस्त नीलकमल बोटीच्या सांगाड्यात आणखी एक मृतदेह सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

‘नीलकमल’ ही प्रवासी बोट पर्यटक आणि प्रवाशांना घेऊन घारापुरीकडे जात होती. दुपारी ३.५५ वाजता नौदलाच्या एका ‘स्पीड बोटी’ने प्रवासी बोटीला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यामुळे ‘नीलकमल’ बोटीला भगदाड पडले. त्यातून पाणी आत शिरल्यामुळे बोट बुडू लागली. अपघाताची माहिती मिळताच नौदल, तटरक्षक दल व मुंबई सागरी पोलिसांच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. नौदलाच्या ११ नौका, तटरक्षक दलाची एक व यलोगेट पोलीस ठाण्याच्या ३ नौका तसेच स्थानिक मच्छीमार नौकांच्या सहाय्याने मदतकार्य सुरू करण्यात आले. नौदलाच्या चार हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली. दोन्ही बोटींवर प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसह असे एकूण ११५ जणांना बचाव कार्यात वाचवण्यात आले. त्यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील आठ मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आल्याचे पोलिसांनी सांगितले. नीलकमल बोटीच्या सांगाड्यात गुरूवारी आणखी एक मृतदेह सापडला. मृत व्यक्ती बोटीतच अडकून पडली होती. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

police registered murder case after body found on mumbai ahmedabad highway
तो अपघात नव्हे तर हत्या; महामार्गावरील अपघाती मृत्यूचे गूढ उकलले
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
two wheeler driver died in Akola on Tuesday after his throat was cut by nylon manja
नायलॉन मांजाचा फास, अकोल्यात गळा चिरून दुचाकी चालकाचा मृत्यू
Tilak Street , Pune, vehicle broke door shop ,
पुणे : टिळक रस्त्यावर मध्यरात्री थरार, भरधाव मोटार दुकानाच्या दरवाजा तोडून आत शिरली
Beed Sarpanch Death by accident
Beed Sarpanch Death: सरपंचाच्या मृत्यूमुळं बीड पुन्हा हादरलं; राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनानं चिरडलं, आमदार सुरेश धसांनी व्यक्त केला संशय
kalyan Drunk and drive drunkard car driver
कल्याणमध्ये मद्यधुंद कार चालकाची दहा दुचाकींना धडक, कार चालक अनिल तिवारी पोलिसांच्या ताब्यात
dead body buried
अज्ञात व्यक्तीचा खून करून मृतदेह जमिनीत पुरला, अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील घटना
worker dies after falling from terrace case registered against contractor for negligence
गच्चीवरुन पडल्याने कामगाराचा मृत्यू; ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल

हेही वाचा…अपघातग्रस्तांसाठी बसची व्यवस्था उपचाराअंती जखमींना घरी पोहोचविले

अपघातानंतर नीलकमल बोटीतील हंसराज भाटी(४३) व जोसान मोहम्मद निसार अहमद पठाण(७) बेपत्ता आहेत. तटरक्षक दलाच्या बोटी व हेलिकॉप्टरद्वारे त्यांचा शोध घेण्यात आला. कुलाबा पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०६(१)), १२५ (अ) (ब), २८२, ३२४ (३)(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Story img Loader