मालाडच्या निर्मला व्होरा (७८) या वृद्ध महिलेच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने व्होरा यांच्या दुकानातील पूर्वीचा नोकर पप्पू उर्फ गिरवरसिंग देवडा (२०) याला उदयपूर येथून अटक केली आहे. कामावरून काढून टाकल्याचा राग आणि पैशांची निकड यामुळे त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.    
मालाड एसव्ही रोड येथील नेमाणी चाळीत राहणाऱ्या निर्मला व्होरा यांची रविवारी चाकूचे वार करून हत्या करण्यात आली होती. मारेकऱ्याने घरातून ३५ तोळे सोन्यासह रोख रक्कम घेऊन पोबारा केला होता. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या युनिट ११ ने याप्रकरणी व्होरा यांच्या उसाच्या दुकानात पूर्वी काम करणारा नोकर गिरवसिंग देवडा याला राजस्थानातील उदयपूर येथून अटक केली.

Story img Loader