ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांना पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी आज मंगळवार अटक होण्याची शक्यता आहे.
मागील आठवड्यात ओम पुरी यांची दुसरी पत्नी नंदिता यांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात ओम पुरी मारहाण करत असल्याची तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम पुरी नंदिता यांना काठीने मारहाण करुन जिवघेणी धमकी देत असत असे नंदिता यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. “आम्ही तक्रार दाखल करुन घेतली असून ओम पुरींवर मारहाण केल्याप्रकरणी आयपीसी कलम ३२४, कलम ५०६ अंतर्गत धमकावणे तसेच कलम ५०९ अंतर्गत महिलांशी असभ्य वागणूक असे गुन्हे दाखल केले आहेत.” असे वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी हरिश्र्चंद्र परमाले यांनी स्पष्ट केले.
तसेच शुक्रवारी पोलीस ओम पुरींच्या बंगल्यावर त्यांना अटक करण्यासाठी होते परंतु, ओम पुरी घरी नव्हते असेही पोलिसांनी सांगितले आहे. सध्या पोलीस ओम पुरींपर्यंत त्यांच्या मोबाईल फोनला ट्रेस करून अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Story img Loader