मुंबई : करोनाच्या उपप्रकारांचा शोध घेण्यासाठी करण्यात आलेल्या जनुकीय चाचणीच्या पंधराव्या फेरीचे निष्कर्ष नुकतेच हाती आले आहेत. या फेरीत २८८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली असून त्यातील सर्वच्या सर्व नमुने हे ओमायक्रॉन या उपप्रकाराने बाधित असल्याचे आढळले आहे. यावरून करोनाचा उपप्रकार असलेल्या ओमायक्रॉनचा अद्याप मुंबईत मुक्काम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा <<< Maharashtra News Live : महाराष्ट्रातील विविध घडामोडींची माहिती एका क्लिकवर

करोना विषाणूच्या जनुकीय सूत्रांचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेंसिंग) हे ऑगस्ट २०२१ पासून थोड्या थोड्या कालावधीने नियमितपणे व फेरीनिहाय करण्यात येत आहे. त्याअंतर्गत १५ व्या फेरीदरम्यान करण्यात आलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष नुकतेच हाती आले आहेत. या १५ व्या फेरीतील चाचण्यांसाठी २८८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. मुंबईतील १०० टक्के नमुने हे ‘ओमायक्रॉन’ या उपप्रकाराने बाधित असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने दिली आहे. या रुग्णांना करोनाची बाधा झाल्याची कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आली नाहीत.सर्व रुग्ण १२ जून ते १ सप्टेंबर २०२२ या कालावधीतील आहेत. तसेच हे सर्व रुग्ण बरे झाले आहेत.

हेही वाचा <<< लोअर परेल उड्डाणपुलासाठी आजपासून चार दिवस मध्यरात्री ‘ट्रॅफिक ब्लॉक’

करोना विषाणुंचे जनुकीय सूत्र निर्धारण केल्यामुळे एकाच विषाणुच्या २ किंवा अधिक प्रजातींमधील फरक ओळखता येतो. या अनुषंगाने उपचार करण्याची नेमकी दिशा निश्चित करणे सोपे होते. परिणामी, करोनाबाधित रुग्णांवर अधिक परिणामकारक उपचार करणेही शक्य होते. पंधराव्या फेरीतील २८८ नमुन्यांपैकी  ३७ टक्के अर्थात १०६  नमुने बीए २.७५ या उपप्रकाराचे आहेत. तर  ३३ टक्के अर्थात ९६ नमुने हे बीए २.७५.१ प्रकाराचे आहेत. २१ टक्के म्हणजेच ६० नमुने हे बीए २.७५.२ प्रकाराचे आहेत.

हेही वाचा <<< ‘अनाथ’ हा शब्द कलंक कसा?; उच्च न्यायालयाची विचारणा

सर्वाधिक रुग्ण तरूण

 २८८ रुग्णांपैकी ३२ टक्के म्हणजे ९१ रुग्ण हे २१ ते ४० या वयोगटातील आहेत. तर ४१ ते ६० या वयोगटातील २७ टक्के म्हणजेच ७७ रुग्णांचा समावेश आहे. २९ टक्के म्हणजेच ८४ रुग्ण ६१ ते ८० या वयोगटातील आहेत. ३ टक्के म्हणजेच १० रुग्ण हे २० वर्षे वयापर्यंतचे तर ९ टक्के म्हणजे २६ रुग्ण हे ८१ ते १०० या वयोगटातील आहेत.

२९ टक्के रुग्णांनी लस घेतलेली नाही

२८८ रुग्णांपैकी १ टक्का अर्थात २ रुग्णांनी लसीची केवळ एकाच मात्रा घेतली आहे. तर  ७० टक्के अर्थात २०२ रुग्णांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. तर २९ टक्के अर्थात ८४ रुग्णांनी लसीची एकही मात्रा घेतलेली नाही.

Story img Loader