एकीकडे राज्यात आणि देशभरात करोनाबाधितांचा आकडा वाढू लागलेला असतानाच तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ओमायक्रॉननं देखील आरोग्य प्रशासनाची चिंता वाढवली आहे. मुंबईत रुग्णसंख्या वाढल्यास लॉकडाऊनचा विचार करण्याचे सूचोवाच पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले होते. मात्र, मुंबईत लॉकडाऊनची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, यासोबतच, ओमायक्रॉनला गांभीर्याने न घेणाऱ्यांना आयुक्तांनी सूचक इशारा दिला आहे. येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये ओमायक्रॉनचा वेगाने प्रसार झाल्याचं दिसून येईल, असं देखील आयुक्तांनी सांगितलं आहे. एबीपीशी बोलताना त्यांनी याविषयी सविस्तर विश्लेषण केलं आहे.

ओमायक्रॉनला फक्त फ्लू समजू नका!

ओमायक्रॉन हा डेल्टापेक्षा सौम्य असल्यामुळे तो फक्त एक फ्लू असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, त्याला गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचं आयुक्त यावेळी म्हणाले. “ओमायक्रॉनला फक्त फ्लू समजू नका. हा फ्लू नाही, व्हायरस आहे. मुंबईत स्थिती सामान्य आहे कारण जागतिक पातळीवर आमच्या लसीकरणाचं प्रमाण चांगलं आहे. १०८ टक्के नागरिकांना पहिला डोस आणि ९० टक्के नागरिकांना दुसरा डोस देऊन झालेला आहे”, असं आयुक्त म्हणाले.

Video Story Of Ravindra Dhangekar And Devendra Fadnavis.
Ravindra Dhangekar: “निवडणूक हरत असल्याचे लक्षात येताच…” फडणवीसांच्या ‘ॲक्सिडेंटल आमदार’ टीकेला धंगेकरांचे प्रत्युत्तर; पाहा व्हिडिओ
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
Chennai Doctor Attack
Chennai : कॅन्सरग्रस्त महिलेच्या मुलाचा डॉक्टरवर चाकुने हल्ला; मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
What Prakash Ambedkar Said?
Prakash Ambedkar : राहुल गांधींवर टीका करताना प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरली, अपशब्द वापरत म्हणाले, “ते आपल्याला..”
What Vikrant Messy Said About Muslims
Vikrant Massey : “देशातल्या मुस्लिमांना धोका नाही, कुणीही..”, विक्रांत मेस्सीचं वक्तव्य; टीकेचा भडीमार
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?

लसीकरण न झालेल्यांच्या मागे ओमायक्रॉन लागणार!

लसीकरणाची नितांत गरज असल्याचं सांगतानाच आयुक्तांनी ओमायक्रॉनला रोखण्यासाठी हे आवश्यक असल्याचं नमूद केलं. “आज सेवन हिल्समधले ऑक्सिजन बेडवरचे जवळपास १०० टक्के रुग्ण लस न घेतलेले आहेत. त्यामुळे लसीकरण न झालेल्या लोकांच्या मागे हा व्हायरस लागणार. त्यांना धोका आहे. त्यांच्यासाठी हा फ्लू नाही. उद्या राज्याच्या इतर भागात हा व्हायरस पोहोचला, तर ज्यांनी लस घेतलेली नाही, ते थेट ऑक्सिजन बेडवर जाऊ शकतात. पण ज्यांचं लसीकरण झालं आहे, त्यांना धोका नाही. जरी लागण झाली, तरी ऑक्सिजन बेडवर जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे लोकांनी ताबडतोब युद्धपातळीवर लस घ्यायला हवी. किमान एक लस घ्यायला हवी”, असं इक्बालसिंह चहल म्हणाले.

मुंबईकडे बघून भ्रमात राहू नका!

दरम्यान, यावेळी बोलताना आयुक्तांनी मुंबईत परिस्थिती सामान्य आहे म्हणून इतरांनीही बिनधास्त राहू नये असा सल्ला दिला आहे. “फक्त मुंबईला बघून इतर राज्यांनी किंवा महाराष्ट्रातल्या इतर भागांनी असं समजू नये की हा फक्त फ्लू आहे. इथे हजारो-लाखो लोक जगभरातून येतात. शेकडो फ्लाईट्स उतरतात. त्यामुळे फेब्रुवारी-मार्चमध्ये हा व्हायरस प्रचंड वेगाने देशात, राज्याच्या इतर जिल्ह्यांत पसरणार आहे. त्यामुळे नागरिकांना विनंती आहे की तुमचं लसीकरण व्हायलाच हवं”, असं ते म्हणाले.

“मुंबईत लॉकडाऊनची गरज नाही”, महापालिका आयुक्तांचा मोठा दिलासा; निर्बंधांबाबत धोरण केलं स्पष्ट!

“आज मुंबईतल्या ऑक्सिजन बेडवरच्या १९०० रुग्णांपेकी ९७ टक्के लोकांनी लसीकरण केलेलं नाही. जर त्यांनी लस घेतलेली असती, तर आज फक्त ३ टक्के रुग्ण ऑक्सिजन बेडवर राहिले असते. मुंबईत १ लाख रुग्णांपैकी फक्त एका व्यक्तीचा मृत्यू होतो. पण ज्या भागात लसीकरण कमी आहे, तिथे हे चित्र बदलू शकतं”, असं ते म्हणाले.

“आपण १०८ टक्के लसीकरण केलं आहे. दक्षिण आफ्रिकेत ५ आठवड्यात ही लाट ओसरली होती. आपल्याकडे तिसरा आठवडा संपतो आहे. अजून १० दिवस पुढे काढले, तर मला खात्री आहे की या केसेस कमी होणार. दोन आठवड्यात रुग्णसंख्या कमी होत असलेली दिसणार. आपण लसीकरणामुळेच याला तोंड देऊ शकलो. आपलं लसीकरण झाल्यामुळे हा साधा फ्लू वाटतोय मुंबईत. पण जिथे लसीकरण झालेलं नाही, तिथे फेब्रुवारी-मार्चमध्ये काय चित्र दिसतंय ते बघा”, असं देखील आयुक्त यावेळी म्हणाले.