मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबईवाहिनीवर साखळी क्रमांक कि.मी १५.७५० येथे गॅन्ट्री बसविण्याचे काम मंगळवार, १३ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) हाती घेणार आहे. मंगळवारी दुपारी १२ ते २ या वेळेत हे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. या कामादरम्यान मंगळवारी द्रुतगती महामार्गावरील मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. यावेळी वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल.

हेही वाचा…मुंबई : कुटुंबातील चौघांना अन्नातून गुंगीचे औषध देऊन ५० लाखांची लूट, दोन नोकरांविरोधात गुन्हा दाखल

traffic system in Swargate area will changed on Tuesday November 19 and Wednesday November 20 pune
स्वारगेट भागात दोन दिवस वाहतूक बदल, मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी पीएमपी बस
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
shiv sena shinde group claim 73 thousand duplicate voters in navi mumbai
गावाकडच्या दुबार मतदारांमुळे नवी मुंबईत खळबळ
local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
police conduct mock drill ahead of pm modi pune tour for Maharashtra Assembly Election 2024
बंदोबस्ताची रंगीत तालीम; मध्यभागात वाहतूक कोंडी
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
Traffic congestion on Mumbai Ahmedabad National Highway due to lack of planning
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नियोजनाअभावी वाहतूक कोंडी, तासंतास अडकून पडल्याने प्रवाशांचे हाल

द्रुतगती मार्गावरून पुणे मुंबई वाहिनीवरील (पुण्याहुन मुंबईकडे येणारी) हलकी वाहने मुंबई वाहिनीवर लेन किमी ५५.००० वरून वळवून मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या जुना पुणे- मुंबई मार्गावरून मार्गस्थ होतील. द्रुतगती मार्गावरून पुणे – मुंबई वाहिनीवरील (पुण्याहुन मुंबईकडे येणारी) हलकी वाहने व बसेस खोपोली एक्झिट कि.मी ३९.८०० येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या जुना पुणे- मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेंडूग टोल नाका मार्गे मुंबई वाहिनीवरून मार्गस्थ होतील.