सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांना पायदळी तुडवून सोमवारी दहीहंडीच्या उत्सवात मुजोरीचे थर रचले गेले! समाजाच्या प्रत्येक स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाही स्वत:च्याच गुर्मीत मश्गूल असलेले दहीहंडी आयोजक आणि गोविंदा पथकांनी बालगोविंदांच्या सहभागावर आणलेली बंदी, ध्वनिमर्यादेचे बंधन, सुरक्षायोजना राबवण्याच्या सूचना सोमवारी अक्षरश: धाब्यावर बसवल्या. याचा परिणामही व्हायचा तोच झाला आणि सोमवारी दिवसभरात मुंबई-ठाण्यात मिळून तब्बल तीनशेहून अधिक गोविंदा जखमी झाले. एका गोविंदा पथकातील ४६ वर्षीय सदस्याचा ठाण्यात चक्कर येऊन मृत्यू झाल्याची घटनाही याच अविवेकाचे द्योतक ठरली. पण एवढे सगळे होत असतानाही अनेक ठिकाणी आयोजक राजकारणी उत्सव शांततेत पार पडल्याच्या बढाया मारताना दिसत होते. तर न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तडक कारवाई करण्याची ग्वाही देणारी पोलीस यंत्रणाही ढिम्मच राहिली.
पालथ्या घडय़ावर पाणी!
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांना पायदळी तुडवून सोमवारी दहीहंडीच्या उत्सवात मुजोरीचे थर रचले गेले! समाजाच्या प्रत्येक स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाही स्वत:च्याच गुर्मीत
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-08-2014 at 03:18 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On big day dahi handis meet sc order half way