मुंबईत आजपासून मोनोरेल सुरु झाली आहे. मात्र, सकाळी ७ वाजता सुटणारी मोनोरेल पहिल्याच दिवशी उशिराने निघाली.
शनिवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखवल्यांनतर मोनो रेल सुरु झाली. आज रविवार असल्यामुळे मोनोची सफर करण्यासाठी शेकडो मुंबईकरांनी रात्रीपासूनच चेंबूर स्टेशनवर गर्दी केली होती. सकाळ झाल्यानंतर गर्दी आणखी वाढली.  पहिल्या मोनो रेलने पहिल्याच दिवशी वेळ चुकवली आहे. त्याचे कारण मात्र प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, यामुळे मोठ्या उत्साहाने मोनो प्रवास करण्यासाठी आलेल्या मुंबईकरांच्या पदरी निराशा पडली. सकाळी सात वाजता सुटणारी पहिली मोनो रेल तब्बल तासभर उशीराने सुटली.

Story img Loader