मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गस्थित सतिमाता व सवेरा हॉटेलनजीक एका ट्रकला आग लागली आहे. त्यामुळे या मार्गावर एकेरी वाहतूक सुरु आहे.
मनोर नजीकच्या नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील सतिमाता व सवेरा हॉटेलनजीक मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर अचानक ट्रकने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझविण्याचे काम सुरू आहे. मनोर पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि वाहतूक पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत.