मुंबई : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकावर अमेटी युनिर्व्हसिटी (साखळी क्रमांक १०.५०० किमी) आणि मडप बोगदा, तसेच खालापूर पथकर नाक्यादरम्यान हायवे ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीमअंतर्गत गँन्ट्री बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) गुरुवारी दुपारी १२ ते २ या वेळेत हे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांची (हलकी तसेच जड-अवजड वाहने) वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे.
हेही वाचा… मुंबई : दुर्दशा झालेल्या उद्यानाच्या डागडुजीला सुरुवात, कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई
हेही वाचा… मुंबई : अक्सा समुद्रकिनाऱ्यावरील समुद्री भिंतीच्या बांधकामाला स्थगिती
वाहनाचालकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. मुंबईहून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने (चारचाकी) शेडुंग फाटा साखळी क्रमांक कि.मी ०८.२०० येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग ४, जुना मुंबई- पुणे महामार्गावरुन शिंग्रोबा घाटातून मॅजिक पॉईंट साखळी क्रमांक कि.मी ४२.००० येथून पुन्हा द्रुतगती महामार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येतील.