मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील १७ पोलिसांना शौर्यपदक, उल्लेखनीय सेवेसाठी तीन पोलिसांना, तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ३९ पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले. नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेले पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने यांनाही शौर्यपदक जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय मुंबईत कार्यरत सहाय्यक पोलीस आयुक्त विजय हातिस्कर, आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदानंद राणे व दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनाही ‘गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले.

अतिरिक्त पोलीस महासंचालक चिरंजीव रामच्छबिला प्रसाद, संचालक राजेंद्र डहाळे व पोलीस सह आयुक्त सतीश गोवेकर यांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. तसेच राज्यातील अधिकारी व कर्मचारी मिळून ३९ जणांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनाही पदक जाहीर झाले आहेत. धुमाळ १८ वर्ष मुंबईतील खंडणी विरोधी पथकात कार्यरत होते. त्यांच्या कारकिर्दीत कुख्यात गँगस्टर संतोष शेट्टी, बंटी पांडे यांच्या अटकेसाठी धुमाळ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांच्याशिवाय दत्तात्रय तुळशीदास शिंदे (उपमहानिरीक्षक), संदीप गजानन दिवाण (उपमहानिरीक्षक) व शिवाजी ज्ञानदेव फडतरे (उपमहाधीक्षक) यांनाही गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.

Deputation in MPSC by circumventing the rules
नियम डावलून ‘एमपीएससी’मध्ये प्रतिनियुक्ती? माहिती अधिकार अर्जाला काय दिले उत्तर?
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक…
Thane, Palghar, Eknath Shinde,
ठाणे, पालघरमध्ये शिंदे यांची भिस्त आयात उमेदवारांवर ?
maharashtra assembly election result 2024
महाराष्ट्रात खरंच राष्ट्रपती राजवट लागू शकते का? संजय राऊतांच्या दाव्यात किती तथ्य? नियम काय सांगतो?
Sassoon Hospital exceeds capacity facing burden of forensic cases steps are being taken to reduce it
‘ससून’वरील ताण कमी होणार! अतिरिक्त पोलीस आयुक्तांचे वानवडी, हडपसर पोलिसांना आदेश
maharashtra assembly elections congress first list of 62 candidates
काँग्रेसची ६२ जागांची पहिली यादी आज; ९६ उमेदवारांवर शिक्कामोर्तब; शिवसेनेबरोबरचा वाद मिटवण्याची जबाबदारी थोरातांवर
CM Eknath Shinde
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले…
law and order in maharashtra ahead of assembly
‘योजने’चे पैसे मिळाले; पण कायदासुव्यवस्थेचे काय?

हेही वाचा – मुंबई : ‘मेट्रो १’वरील दैनंदिन प्रवासी संख्येचा विक्रम, मंगळवारी ५ लाखांहून अधिक प्रवाशांनी केला प्रवास

मुंबईतील सदानंद राणे, हातिस्कर व होनमाने यांना पदके

आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदानंद राणे यांनाही ‘गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले आहे. राणे यांनी उल्हासनगर, भिवंडी, नवी मंबई व मुंबई येथे कार्यरत असताना आपल्या कामची छाप उमटवली होती. मुंबईत कुर्ला येथील गुन्हे शाखा, ना. म. जोशी मार्ग व आर्थिक गुन्हे शाखेचे हाउसिंग युनीट १ चे येथे ते कार्यरत होते. भिवंडीसारख्या संवेदनशील शहरात काम करताना विविध गणेशोत्सव मंडळे, मशीद व्यवस्थापन यांच्यात समन्वय, नवी मुंबई येथील संवेदनशील अशा जेरोम सलढाणा यांचा खून, मुंबईतील इस्थर अनुहया प्रकरण, नवी मुंबई येथील मन्नपुरम गोल्डच्या दोन कोटींहून अधिक किंमतीच्या सोने दरोड्याची घटना अशा प्रकरणांची उकल त्यांनी केली आहे. आर्थिक गुन्हे विभागात कार्यरत असताना गुंतवणूक योजनांद्वारे फसवणूक झालेल्या पीडित गुंतवणूकदारांना न्यायालयीन कार्यवाहीने ५० कोटी रुपयांहून अधिक रक्कमांचा परतावा देण्याची कार्यवाही त्यांनी केली आहे.

गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विजय हातिस्कर यांनाही गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. हातिस्कर रायगड, सिंधुदुर्ग येथे सुरुवात व नंतर १७ वर्ष मुंबई येथे सेवा केली असून रायगड आणि मुंबईतील आरसीएफ, मालाड या पोलीस ठाण्यामध्ये अनेक तपास केलेल्या गंभीर गुन्हामध्ये आरोपींना शिक्षा झाली होती. १९९५ तुकडीचे पोलीस अधिकारी असलेले अशोक होनमान यांनी नवी मुंबई, ठाणे, पालघर व मुंबई या ठिकाणी काम केले आहे. ते सध्या दहिसर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते पालघर गुन्हे शाखा, भिवंडी गुन्हे शाखा, माणिकपूर पोलीस ठाणे अशा महत्त्वाच्या ठिकाणी कार्यरत होते.

हेही वाचा – म्हाडा पुनर्रचित ३८८ इमारतींमधील रहिवाशांचा २८ ऑगस्टला म्हाडा मुख्यालयावर मोर्चा

महाराष्ट्रातील पदक विजेत्यांची नावे

शौर्य पदक विजेते

डॉ. कुणाल शंकर सोनावणे – सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर

दीपक रंभाजी औटे – पोलीस उपनिरीक्षक

कै. धनाजी तानाजी होनमाने – पोलीस उपनिरीक्षक (मरणोत्तर)

नागेशकुमार बोंड्यालू मदारबोईना- नायक पोलीस हवालदार

शकिल युसूफ शेख- पोलीस हवालदार

विश्वनाथ समैय्या पेंडम – पोलीस हवालदार

विवेक मानकू नरोटे – पोलीस हवालदार

मोरेश्वर नामदेव पोटवी – पोलीस हवालदार

कैलास चुंगा कुळमेठे – पोलीस हवालदार

कोटला बोटू कोरामी – पोलीस हवालदार

कोर्के सन्नी वेलाडी- पोलीस हवालदार

महादेव विष्णू वानखेडे – पोलीस हवालदार

अनुज मिलिंद तरे – अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक

राहुल नामदेव नेव्हाडे- पोलीस उपनिरीक्षक

विजय दादासो सपकाळ – पोलीस उपनिरीक्षक

महेश बोरू मिच्छा- हेड कॉन्स्टेबल

समैय्या लिंगय्या असम – नायक पोलीस हवालदार

उल्लेखनीय सेवा पदक

चिरंजीव रामच्छबिला प्रसाद- अतिरिक्त महासंचालक, महाराष्ट्र

राजेंद्र बाजीराव डहाळे- संचालक, महाराष्ट्र

सतीश रघुवीर गोवेकर, पोलीस सहआयुक्त, महाराष्ट्र


गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक

दत्तात्रय तुळशीदास शिंदे, उप महानिरीक्षक

संदीप गजानन दिवाण, उप महानिरीक्षक

शिवाजी ज्ञानदेव फडतरे, उप महाधीक्षक

संजय मारुती खांदे, महाधीक्षक

विनीत जयंत चौधरी, उप महाधीक्षक

प्रकाश पांडुरंग गायकवाड, उपनिरीक्षक

सदानंद जानबा राणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,

विजय मोहन हातिस्कर, सहाय्यक पोलीस आयुक्त

महेश मोहनराव तराडे, उप महाधीक्षक

राजेश रमेश भागवत, निरीक्षक

गजानन कृष्णराव तांदूळकर, उपनिरीक्षक

राजेंद्र तुकाराम पाटील, उपनिरीक्षक

संजय साहो राणे, उपनिरीक्षक

गोविंद दादू शेवाळे, उपनिरीक्षक

मधुकर पोछा नैताम, उपनिरीक्षक

अशोक बापू होनमाने, निरीक्षक

शशिकांत शंकर तटकरे, उपनिरीक्षक

अक्षयवारनाथ जोखुराम शुक्ला, उपनिरीक्षक

शिवाजी गोविंद जुंदरे, उपनिरीक्षक

सुनील लयाप्पा हांडे, सहाय्यक उपनिरीक्षक

प्रकाश मोतीराम देशमुख, उपनिरीक्षक

दत्तू रामनाथ खुळे, सहाय्यक उपनिरीक्षक

रामदास नागेश पालशेतकर, निरीक्षक (पीए)

देविदास श्रावण वाघ, सहाय्यक उपनिरीक्षक

प्रकाश शंकर वाघमारे, सहाय्यक उपनिरीक्षक

संजय दयाराम पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक

मोनिका सॅम्युअल थॉमस, सहाय्यक उपनिरीक्षक

बंडू बाबुराव ठाकरे, मुख्य शिपाई

गणेश मानाजी भामरे, मुख्य शिपाई

अरुण निवृत्ती खैरे, मुख्य शिपाई

दीपक नारायण टिल्लू, मुख्य शिपाई

राजेश तुकारामजी पैदलवार, मुख्य शिपाई

श्रीकृष्ण गंगाराम हिरपूरकर, सहाय्यक कमांडंट

राजू संपत सुर्वे, निरीक्षक

संजीव दत्तात्रेय धुमाळ, निरीक्षक

अनिल उत्तम काळे, सहाय्यक उपनिरीक्षक

मोहन रामचंद्र निखारे, सहाय्यक उपनिरीक्षक

द्वारकादास महादेवराव भांगे, सहाय्यक उपनिरीक्षक

अमितकुमार माताप्रसाद पांडे, उपनिरीक्षक