मुंबई: पाचव्या दिवशी गौरी – गणपतीच्या विसर्जनासाठी शनिवारी दुपारपासून बेस्टच्या अनेक फेऱ्या खंडित करण्यात आल्या. काही मार्गांवरील बस अन्य मार्गाने वळवण्यात आल्या. परिणामी, प्रवाशांची गैरसोय झाली.
भाईंदर येथे गणेश विसर्जनामुळे बस मार्ग क्रमांक सी ७२, ७०६, ७०७, ७०९, ७१०, ७१८, ७२० ची सेवा दुपारी ३ पासून खंडित करण्यात आली. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील लालबाग परिसरात गणेश दर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आल्यामुळे पोलिसांनी रस्ता बंद केला होता.
हेही वाचा… शीव रुग्णालयामध्येही बोन मॅरो प्रत्यारोपण शक्य
परिणामी, अप दिशेकडे जाणाऱ्या बस मार्ग क्रमांक १, ४, ५, ६, ७, ८, ११, १५, १९, २१, २२, २५, ५१ ची सेवा दुपारी ३ पासून भायखळा पुलावरून सुरू होती. तसेच बस मार्ग क्रमांक ९, ६९, १३४ च्या फेऱ्या अप दिशेमध्ये ६७ प्रमाणे विकी हॉटेलपासून पुढे गोपाळ नाईक चौकापर्यंत होतील. तर पुढे या बसगाड्या पूर्ववत मार्गाने जातील, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली.