मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त हरिद्वार येथील पतंजलि योगपीठाच्या मैदानात रामदेव बाबांनी २० हजार साधकांबरोबर योगसाधना केली. या वेळी बोलताना रामदेव बाबा म्हणाले की, ‘पतंजलि विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना ऑक्सफर्ड, हार्वर्ड, स्टेनफोर्ड यांसारखी विद्यापीठे, आयआयटी आणि आयआयएमसारख्या संस्थांच्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक आरोग्य व संपत्तीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. भारतातून संपूर्ण जगभरात योगसाधक पाठवले जातील असेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हे विद्यार्थी केवळ रोगांवर उपचार करणार नाहीत तर प्रत्येक क्षेत्रात जगाचे नेतृत्व करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच पतंजलि विद्यापीठामध्ये भारतीय संस्कृती आणि प्राचीन ज्ञान याबरोबरच विद्यार्थ्यांना विज्ञान, गणित, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, अवकाश तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान या विषयांचे शिक्षण दिले जाईल अशी माहिती रामदेव बाबांनी दिली.