करोनाविषयक नियम हटविल्यानंतर यंदा निर्बंधमुक्त वातावरणात व्हॅलेंटाईन डे साजरा होत आहे. अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या ‘व्हॅलेंटाईन डे’ची तरूण मंडळी आतुरतेने वाट पाहात आहे. दरवर्षी ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त फुलबाजारांमध्ये गुलाबाच्या फुलांची मोठ्या प्रमाणावर आवक होते. मात्र यंदाही गुलाबाला मोठ्या प्रमाणावर मागणी असली त्याची आवक मात्र आटली आहे. त्याचा परिणाम गुलाबाच्या किंमतीवर होण्याची चिन्हे आहेत. आजघडीला गुलाबाचे फूल १५ रुपयांना मिळत असून १४ फेब्रुवारीपर्यंत त्याच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यात वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा >>>“अदाणी शेअर बाजारातील ‘बिग बुल’, तर मोदी त्यांच्यासाठी…”; ‘काऊ हग डे’वरून शिवसेनेचं टीकास्र!

Gold Silver Price Today 10th November 2024 in Marathi
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष
Mangal rashi parivartan 2024
मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या लोकांना पुढील १३८ दिवस होणार आकस्मिक धनलाभ
election day fun facts election day activities voting activities on Election Day
मतदान दिनाच्या गमतीजमती!
Sun Rashi Parivartan 2024
सूर्य करणार मालामाल; वृश्चिक राशीतील राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी

दरवर्षी व्हॅलेंटाईन डेनिमित्त कोल्हापूर, सातारा आदी भागातून गुलाबाच्या फुलांची मुंबईत आवक होते. कोल्हापूर, साताऱ्यातून केवळ मुंबईतच नव्हे तर बंगळुरू, हैदराबाद आणि दिल्लीमध्येही गुलाबाचा पुरवठा होतो. मात्र यंदा कोल्हापूर, साताऱ्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी कुलाब पुष्पाचे उत्पादन बंद केले आहे. त्यामुळे मुंबईसह बंगळुरू, हैदराबाद आणि दिल्लीतील गुलाबाची आवक आटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बदलत्या हवामानाचा फटका
बदलत्या हवामानामुळे फूल उत्पादकांना फटका बसत आहे. काही दिवसांपूर्वी थंडी आणि ढगाळ हवामान असे मिश्र वातावरण होते. ढगाळ वातावरणामुळे परिपक्वता लवकर आल्यामुळे पंधरा दिवसांअगोदर गुलाबाची बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक झाली होती. मात्र आता मागणी इतकी आवक होत नाही, असे फुल बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>राज्यात आजपासून ‘वंदे भारत’; देशातील नवव्या, दहाव्या रेल्वेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

करोनानंतर उद्योगास चालना नाही

करोनाकाळापूर्वी व्हॅलेंटाईन डेनिमित्त बाजारात तीस लाख फुलांची आवक होत होती. प्रामुख्याने मुंबई, दिल्ली येथे गुलाब पाठवण्याची लगबग सुरू असायची. करोनाकाळात चित्र बदलले. मागणी नसल्यामुळे फूल उत्पादकांचे आर्थिक नुकसान झाले. सध्या लग्नसराई सुरू असून यासाठी फुलांची तोडणी सुरू असल्याचे उत्पादकांनी सांगितले.

दोन वर्षांपासून मागणी आटल्यामुळे फुलांचे उत्पादन मर्यादित स्वरुपात घेतले जात होते. तसेच करोनानंतर व्यापारात स्थिरता येत नसल्याने फुलांची निर्यात करणेही परवडत नाही. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत फुलांचा पुरवठा करावा लागत आहे.-सुनील म्हाब्दी, विक्रेते