मुंबई : भांडुप पश्चिम येथील एलबीएस मार्गावर असलेल्या ड्रीम मॉलमध्ये मंगळवारी सकाळी पोलिसांना एका महिलेचा मृतदेह मिळाला आहे. याबाबत भांडुप पोलिसांनी घटनेची नोंद करून तपास सुरू केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भांडुप येथील या ड्रीम मॉलचा बराचसा भाग बंद असून काही वर्षांपूर्वी तेथील पहिल्या मजल्यावर असलेल्या एका रुग्णालयाला भीषण आग लागली होती. त्यावेळी हा मॉल चर्चेत आला होता. दरम्यान मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास काही कर्मचारी या मॉलमधील तळघरात काही काम करत असताना त्यांना तेथे साचलेल्या पाण्यात एका महिलेचा मृतदेह मिळून आला आहे. कर्मचाऱ्यानी तत्काळ त्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर भांडुप पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साधारण ३० ते ३५ वयोगटातील महिलेचा मृतदेह असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पालिका रुग्णालयात पाठवला आहे. आद्यप तरी या मृतदेहाची ओळख पटली नसून भांडुप पोलिसांनी सध्या अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.