मुंबई : अंधेरी येथील गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी आज मध्यरात्री १.१० पासून ते उद्या (बुधवारी) पहाटे ४.४० पर्यंत पश्चिम रेल्वेने ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे, हार्बर मार्गिकेवरील अप-डाऊन आणि पश्चिम रेल्वेच्या अप-डाउन धीम्या-जलद मार्गासह पाचव्या-सहाव्या मार्गावर ब्लॉक असेल. परिणामी, मंगळवारी रात्री उशिरा धावणाऱ्या आणि बुधवारी पहाटे सुटणाऱ्या आठ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंगळवारी रात्री रद्द असलेल्या लोकल

रात्री १०.१८ वाजताची विरार-अंधेरी लोकल

रात्री ११.१५ वाजताची वसई रोड-अंधेरी लोकल

मध्यरात्री १२.३१ वाजताची चर्चगेट-विलेपार्ले लोकल

बुधवारी पहाटे रद्द असलेल्या लोकल

पहाटे ४.२५ वाजताची अंधेरी-विरार लोकल

पहाटे ४.०५ वाजताची वांद्रे-बोरिवली लोकल

पहाटे ४.५३ वाजताची बोरिवली-चर्चगेट लोकल

पहाटे ४.४० वाजताची अंधेरी-विरार लोकल

पहाटे ४.०५ वाजताची अंधेरी-चर्चगेट लोकल

बुधवारी विलंबाने धावणाऱ्या लोकल

विरार-चर्चगेट – पहाटे ३.२५ (१५ मिनिटे)

बोरिवली-चर्चगेट – पहाटे ४.०५ (१५ मिनिटे)

विरार-बोरिवली – पहाटे ३.३५ (१० मिनिटे)

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On western railway gokhale flyover work impact will on local train services mumbai print news asj