गेल्या कित्येक दिवसापासून शांत असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी पुन्हा एकदा परप्रांतियांवर शाब्दिक हल्ला चढवला. मुंबईत सुरू असलेल्या कोकण महोत्सवाला हजेरी लावल्यानंतर बोलताना, ते म्हणाले, की कोकणातील जमिनी परप्रातींयाच्या घशात घातल्या जात आहेत, हा कोकणाचा विकास आहे का? दिल्लीमधील बलात्काराची घटना निंदनीय आहेच, पण त्यामागील सूत्रधार हे बिहारचेच आहेत. यावर शीला दीक्षित, सोनिया गांधी किंवा इतर कोण का बोलत नाही, असा प्रश्नही त्यांनी केला.

Story img Loader