मुंबई : म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या वांद्रे पूर्व येथील म्हाडा भवनातील दालनात पुन्हा एकदा धक्काबुक्कीचा प्रकार घडला आहे. एका रहिवाशाने जयस्वाल यांना धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संबंधित रहिवाशाविरोधात खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वीही उपाध्यक्षांच्या दालनात धक्काबुक्कीच्या दोन घटना घडल्या असून एका घटनेप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

म्हाडा भवनात विविध कामासाठी म्हाडा रहिवासी, नागरिक येतात. अनेक रहिवाशांचे अधिकारी-कर्मचार्यांकडून योग्य ते समाधान होत नसल्याने आपल्या तक्रारी, समस्या घेऊन ते थेट उपाध्यक्षांकडे जातात. अशीच एक तक्रार घेऊन एक रहिवासी गुरुवारी म्हाडा भवनातील उपाध्यक्षांच्या दालनात गेले होते. ते तक्रार मांडत असताना काही वाद झाला आणि त्यातून धक्काबुक्की झाली. जयस्वाल यांना धक्काबुक्की केल्याचे म्हटले जात असून याप्रकरणी अखेर गुरुवारी खेरवाडी पोलीस ठाण्यात रहिवाशा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ कविदास जांभळे यांनी दिली.