‘व्हॉटसअॅप’ वर धार्मिक भावना दुखावणारा वादग्रस्त मजकूर टाकणाऱ्या एका तरुणास मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. हा मजकूर टाकल्यानंतर परिसरात तणाव पसरला होता. पण पोलिसांनी हस्तक्षेप करून या तरुणाला ताब्यात घेतले.
नवरत्न चौधरी (२४) हा मालाडच्या एका दुकानात काम करतो. तेथील कर्मचाऱ्यांनी व्हॉटसअॅपवर एक ग्रुप बनविला होता. त्यात एकूण २० सदस्य होते. ‘बीएमसी मार्केट’ असे त्या ग्रुपचे नाव ठेवले होते. बुधवारी रात्री चौधरीने या ग्रुपवर एक आक्षेपार्ह धार्मिक मजकूर टाकला होता. त्याचे तीव्र पडसाद उमटले. रात्री जमावाने चौधरीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्याला अटक केली.
बॉम्बची धमकी देणाऱ्यास अटक
मुंबई : मिलन सब वे बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या एका मद्यपीला सांताक्रूझ पोलिसांनी अटक केली आहे. राजेश कवाटिया असे त्याचे नाव आहे. त्याने बुधवारी नियंत्रण कक्षाला फोन केला होता.

Story img Loader