लोकल पकडून चर्चगेटहून बोरिवलीला निघालेल्या तरुणीचा विनयभंग करून पळ काढणाऱ्या तरुणाला दुसऱ्या दिवशी त्याच प्रयत्नात असताना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने लोहमार्ग पोलिसांनी ही कारवाई केली. सोमवारी बोरिवलीला जाण्यासाठी सकाळी सव्वासहाच्या सुमारास एक तरुणी महिलांच्या डब्यात बसली. गाडी सुरू झाल्यानंतर दबा धरून बसलेल्या पांडी वन्नीयर (२०) या तरुणाने डब्यात प्रवेश केला. त्याने या तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता.  मंगळवारी पोलिसांनी पहाटे चारपासूनच चर्चगेट स्थानकात सापळा रचून  त्याला पकडले.

Story img Loader