लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई : मालेगाव बँकेतील १२५ कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने अहमदाबाद विमानतळावरून अक्रम मोहम्मद शफीला अटक केली. त्याच्याविरोधात लुक आऊट सर्कुलर जारी करण्यात आले होते. तो दुबईला जाण्याचा प्रयत्न करत असताना इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले.

आणखी वाचा-जुन्या चित्रपटांच्या पुन:प्रदर्शनाचा ट्रेण्ड सुरूच… ‘करण अर्जुन’, ‘बीवी नंबर वन’ हे चित्रपट पुन:प्रदर्शित होणार

मालेगाव येथील सिराज अहमदने दोन बँकांमध्ये १४ खाती उघडून त्यातील रकमेचा निवडणुकीसाठी कथित गैरवापर केल्याच्या आरोप आहे. याप्रकरणी ईडीने गेल्या आठवड्या ठाणे, वाशी, मालेगाव, नाशिक, सूरत आणि अहमदाबादमध्ये व्यापारी आणि बनावट कंपन्यांशी संबंधित २४ ठिकाणी छापे टाकले होते. गेल्या सहा महिन्यांपासून मालेगावमधील १४ बँक खात्यांमध्ये सुमारे १२५ कोटी रुपये जमा झाले असून त्यातील रक्कम अहमदाबाद येथील १० बँक खात्यांवर हस्तांतरित झाली आहे. अहमदाबाद येथील १० बँक खात्यांमध्ये २०० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. बँक खात्यातून ही रक्कम काढण्यात आली आहे.