मुंबई: बोरिवली पूर्व येथे गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत सात किलो चरससह एकाला अटक करण्यात आली. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या चरसची किंमत दोन कोटी ११ लाख रुपये असून त्याच्याविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ २५ ते २७ वर्ष वयोगटातील एक संशयीत अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ४ ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ सापळा रचण्यात आला. आरोपी तेथे येताच त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील बॅगची तपासणी केली असता त्यात १४ वड्या मिळाल्या. त्यामध्ये एकूण ७ किलो ४० ग्रॅम वजनाचा चरस सापडला. या चरसच्या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत अंदाजे दोन कोटी ११ लाख रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Pune, kidnappers , Crime Branch action,
पुणे : अपहरण करणारे गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई, आर्थिक व्यवहारातून अपहरण
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Two arrested for illegally carrying pistols
बेकायदा पिस्तूल बाळगणारे दोघे अटकेत
mastermind , construction businessman murder ,
पुणे : बांधकाम व्यावसायिकाच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार अटकेत, दोन कोटींच्या खंडणीसाठी अपहरण
Why is the surrender of Naxalite godmother Tarakka important
३४ वर्षांपासून चळवळीत… १७० हून अधिक गुन्हे, चार राज्यांत १ कोटींचे बक्षीस… नक्षलींची ‘गॉडमदर’ तारक्काचे आत्मसमर्पण का महत्त्वाचे?
aiu arrested two passengers from Mumbai airport for smuggling ganja
बँकॉकवरून आणलेला सव्वाचार कोटी रुपये किंमतीचा गांजा जप्त, दोन प्रवाशांना अटक
15 year old accused stealed Rs 32 000 and mobile from 80 year old man
गांजा बाळगणाऱ्या दोघांना पकडले
Mumbai police register fraud case of Rs 2 crore against gujarat man
दोन कोटींच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल; रक्कमेतून आरोपीने बंगला बांधला, तसेच दुबईतून दागिने खरेदी केल्याचा आरोप
Story img Loader