बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या मोहम्मद अस्लम शौकत अली खान याच्याकडून मंगळवारी संध्याकाळी तब्बल ९९ लाख ९३ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली. यामध्ये ५०० रुपये आणि एक हजार रुपयांच्या नोटा होत्या.
दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिसांनी मिळालेल्या माहितीनंतर मिनव्र्हा चित्रपटगृहाजवळ सापळा रचला. सायंकाळी सातच्या सुमारास बेस्ट बस मार्ग क्रमांक ७४ थांबविण्यात आली आणि पोलिसांनी या प्रवाशाजवळून ही रोकड जप्त केली. खान हा मरीनलाईन्स येथील सीएकडे शिपाई म्हणून काम करणारा असून ही रोकड हवाला व्यवहारातील असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. मोहम्मद अस्लम शौकत अली खान याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
बेस्ट बसमधून एक कोटीची रोकड जप्त!
बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या मोहम्मद अस्लम शौकत अली खान याच्याकडून मंगळवारी संध्याकाळी तब्बल ९९ लाख ९३ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली. यामध्ये ५०० रुपये आणि एक हजार रुपयांच्या नोटा होत्या.
First published on: 17-04-2013 at 04:45 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One crore cash found in best bus