मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईमधील मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू असून मुंबईत एकूण १ कोटी १ लाखाहून अधिक मतदार आपले मत नोंदवणार आहेत. त्यामध्ये ४७ लाख महिला, तर ५४ लाख पुरुष मतदार आहेत. मुंबईत सर्वाधिक मतदार उपनगरातील चांदिवली परिसरात, तर सर्वात कमी मतदार शहर भागातील वडाळा परिसरात आहेत.
येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण ३६ विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी १० विधानसभा मतदारसंघ मुंबई शहर जिल्ह्यात आणि २६ विधानसभा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात आहेत.
हेही वाचा – मुंबई : घरात घुसून महागड्या वस्तू चोरी करणाऱ्या महिलेला अटक
मतदार नोंदणीसाठी मदत क्रमांक
मतदार नोंदणीसाठी १९ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, विधानसभा निवडणूक कार्यालयात मतदार नोंदणीबाबतचे अर्ज उपलब्ध आहेत. त्या कार्यालयात अर्ज भरून जमा करावयाचे आहे. तसेच ऑनलाईन मतदार नोंदणी करण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि अधिक माहितीसाठी हेल्पलाईन क्र. १९५० (टोल फ्री) वर संपर्क साधावा.
मतदारांच्या मदतीसाठी
Voter helpline App – मतदारांना आपले नाव मतदार यादीत तपासता येईल व नवीन मतदार नोंदणी या ॲपद्वारे करता येईल. KYC App – उमेदवारांबाबत माहिती या ॲपवर उपलब्ध होऊ शकेल. Cvigil ॲपच्या मदतीने आचारसंहिता उल्लंघन संदर्भातील तक्रार मतदारांना करता येते. या ॲपवर केलेल्या तक्रारींचे १०० मिनिटांत निराकरण केले जाते.
हेही वाचा – मुंबई : मतदान केंद्रावर मोबाइल नेण्यास बंदीच
मतदार हेल्पलाईन क्रमांक. १९५०
जिल्हाधिकारी मुंबई उपनगर कार्यालय- १८००२६८२९१०
जिल्हाधिकारी मुंबई शहर यांचे कार्यालय- नियंत्रण कक्ष क्रमांक- ०२२-२०८२२७८१
निवडणूक नियंत्रण कक्ष – ७९७७३६३३०४
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांची संख्या
बोरिवली ३२३६९५
दहिसर २७६२९८
मागाठाणे ३०२१३०
कांदिवली २८५०८३
चारकोप ३१४२२२
मालाड पश्चिम ३५२७६१
जोगेश्वरी २९५८२१
दिंडोशी ३०२६०८
गोरेगाव ३२४३७६
वर्सोवा २८२८१९
अंधेरी पश्चिम २८५२२१
अंधेरी पूर्व २८४७०८
मुलुंड २९४४२३
विक्रोळी २४१११४
भांडूप पश्चिम २८४२३१
घाटकोपर पश्चिम २७३३४४
घाटकोपर पूर्व २४७३९०
मानखुर्द शिवाजीनगर ३२३४२०
अणुशक्तीनगर २६६५४८
चेंबूर २५७१६५
विलेपार्ले २७४२५८
चांदिवली ४४६७६७
कुर्ला २८९४६८
कलिना २३९८६३
वांद्रे पूर्व २४७६३९
वांद्रे पश्चिम २८७०२५
धारावी २६०७४७
सायन-कोळीवाडा २८१२९९
वडाळा २०४९०५
माहिम २२५३६७
वरळी २६३६४२
शिवडी २७३९५५
भायखळा २५७८४९
मलबार हिल २६०५३८
मुंबादेवी २४१२३५
कुलाबा २६४७३९
मुंबईतील एकूण मतदार १ कोटी १ लाख ८२ हजार २४३
महिला – ४७ लाख ३३ हजार ३९५
पुरुष – ५४ लाख ४७ हजार ७७४
सर्वात जास्त मतदार – चांदिवली – ४४६७६७
सर्वात कमी मतदार – वडाळा – २०४९०५
उपनगरातील मतदार
महिला – ३५ लाख ६१ हजार ५८७
पुरुष – ४० लाख ८५ हजार ५५०
तृतीयपंथी – ८३१
ज्येष्ठ नागरिक – ९३ हजार ४४८
नवमतदार संख्या – १ लाख २२ हजार ९१९
दिव्यांग मतदार – १७ हजार २०९
सर्व्हिस वोटर – १०८९
अनिवासी भारतीय मतदार – १८६७
एकूण मतदारांची संख्या – ७६ लाख ४७ हजार ९६७
मुंबई शहरातील एकूण मतदार
मतदारांची एकूण संख्या – २५ लाख ३४ हजार २७६
महिला – ११ लाख ७१ हजार ८०८
पुरुष – १३ लाख ६२ हजार २२४
तृतीयपंथी – २४४
ज्येष्ठ नागरिक (८५ ) – ५४ हजार ६३
नवमतदार संख्या – ३७ हजार ८९४
दिव्यांग मतदार – ६ हजार ३३४
सर्व्हिस वोटर – ३९२
अनिवासी भारतीय मतदार – ४०६