वर्तकनगर येथील फायरिंग रेंज परिसरात सोमवारी सकाळी एक दिवसाचे अर्भक आढळून आले. कपडय़ात गुंडाळलेली ही तान्ही मुलगी रडत असल्याचा आवाज या भागात सकाळी फेरफटका मारण्यासाठी आलेल्या रहिवाशांना आला. त्यांनी वर्तकनगर पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी अर्भकास ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात दाखल केले. या तान्ह्य़ा मुलीची तब्येत स्थिर आहे.

Story img Loader