मुंबई : भायखळा येथील इंदू मिल ऑईल कंपाऊंडमध्ये गुरुवारी मध्यरात्री वडाचे भलेमोठे झाड उन्मळून पडले. या दुर्घटनेत रेहमान खान (वय२२) यांचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे. झाडाच्या फांद्यांखाली अडकलेल्या इतर व्यक्तींचा शोध आणि बचावकार्य सध्या सुरू आहे. मुंबईत पावसाळा सुरू झाल्यापासून विविध भागात पडझडीच्या अनेक घटना घडत आहेत. बुधवारी एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी झाड पडून दोघांचा मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भायखळा येथे उन्मळून पडलेले वडाचे झाड गुरुवारी मध्यरात्री नजीकच्या झोपडीवर पडले. डेरेदार झाडाच्या फांद्यांमध्ये दोन – तीनजण अडकले. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, संबंधित पालिका कार्यालयातील कर्मचारी, पोलीस, रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आणि तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना उपचारासाठी नजीकच्या जेजे रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रेहमान खान (वय२२) याना डॉक्टरांनी मृत घोषित केले. रिजवान खान (वय २०) यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One dead one injured after a tree fell in byculla mumbai print news ysh
Show comments