मध्य रेल्वेवर कुर्ला – सायन दरम्यान लोकल ट्रेनमधून पडून एकाचा मृत्यू झाला. तर दोन जण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कुर्ला आणि सायन या स्टेशन दरम्यान मंगळवारी रात्री तीन जण लोकल ट्रेनमधून पडल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना तीन प्रवासी जखमी अवस्थेत आढळले. तिघांना आधी घाटकोपरमधील राजावाडी आणि तिथून टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून अन्य दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. गर्दीमुळे ते तिघे ट्रेनमधून पडले असावे, अशी शक्यता आहे. जखमी व मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.