बस पुढे गेल्याने विद्यार्थी बचावले; तक्रार करूनही पालिकेचे वृक्षांबाबत दुर्लक्ष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नेहमीप्रमाणे मालाडच्या सुंदर नगरमधून ५२ विद्यार्थ्यांना घेऊन शाळेची बस निघाली. शिवम् को-ऑप. सोसायटीच्या दारातून ती पुढे सरकली आणि क्षणात सोसायटीच्या आवारातील मोठे झाड उन्मळून पडले. या अपघातात शाळकरी मुले बचावली तरी बसमागील कारवर हे झाड कोसळले. त्यात पराग पावसकर (४५) यांचा मृत्यू झाला.

मालाडमधील एस.व्ही. रोडवरील सुंदर नगरजवळ शुक्रवारी ही दुर्घटना घडली. या रस्त्यावर दालमिया महाविद्यालय, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण स्कूल आणि खेतान स्कूल आहे. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी या रस्त्यावर प्रचंड वर्दळ असते. शाळेच्या विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या बसगाडय़ांचीही येथे वर्दळ असते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सोडण्या-आणण्यासाठी येणाऱ्या पालक वर्गाचीही मोठी गर्दी ठरावीक वेळेत येथे असते.

नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी विद्यार्थी याच रस्त्याने आपल्या शाळेत निघाले होते. शाळेची बस ५२ विद्यार्थ्यांना घेऊन सुंदर नगरमधील गेट क्रमांक १ जवळून पुढे सरकली आणि काही क्षणात पदपथावरील मोठे झाड उन्मळून पडले. कोसळलेल्या या झाडाच्या आवाजाने बसमधील विद्यार्थ्यांचा थरकाप उडाला. बसमागून येणाऱ्या कारवर हे झाड कोसळून पराग पावसकर यांचा त्यात मृत्यू झाला. काही क्षण आधी हे झाड कोसळले असते तर मोठी दुर्घटना घडली असती, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

पावसाळा जवळ आल्यामुळे सुंदर नगरमधील सोसायटीने आपल्या आवारातील झाडांची छाटणी करण्यासाठी पालिकेला पत्र पाठविले होते. तसेच आवारातील झाडांची छाटणी सोसायटीने करूनही घेतली होती.

सुंदर नगर परिसरात दोन शाळा, महाविद्यालय असल्याने तेथे विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते. तसेच गर्दीमुळे या मार्गावरील झाडांची छाटणी करावी, असे पत्र आपण पालिकेच्या पी-दक्षिण विभाग कार्यालयाला दिले होते. कोसळलेल्या झाडाच्या फांद्यांची काही दिवसांपूर्वी छाटणी करण्यात आली होती.

– स्नेहा झगडे, नगरसेविका