मोटरसायकल सुरू करीत असताना अचानक स्फोट होऊन आग लागल्याने एका इसमाचा भाजून मृत्यू होण्याची घटना परळ येथे घडली. आगीत भाजल्याने  केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता काही तासांतच त्याचा मृत्यू झाला. मोटरसायकलचा स्फोट होऊन त्यात दगावण्याची बहुधा ही पहिलीच घटना असावी, असा दावा पोलिसांनी केला.
परळ येथे राहणारे विपुल गडा यांची मोटरसायकल सुपारी बाग वाहतूक पोलीस चौकीसमोरील कलकत्तावाला बिलिंडग आणि वेलिंग्टन हाऊस बिल्डिंग यांच्यातील  मोकळ्या जागेत उभी केलेली असते. गडा हे सकाळी दहाच्या सुमारास मोटरसायकल सुरू करीत होते. त्या वेळी कॉबरेरेटर जोरात उडून स्फोट झाला. अचानक मोटरसायकलने पेट घेतला. या आगीत गडा हेही भाजल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना केईएम इस्पितळाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले, परंतु दुपारी साडेबाराच्या सुमारास ते मरण पावले.

Story img Loader