मुंबई : अंधेरी येथील वर्सोवा येथून शनिवारी रात्री ८ वाजता मासेमारीसाठी समुद्रात गेलेली नौका उलटून एकाचा बुडून मृत्यू झाला, तर एकजण बेपत्ता आहे. एकाने मात्र पोहून समुद्र किनारा गाठला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत विनोद गोयल (४५) यांचा मृत्यू झाला, तर उस्मानी भंडारी (२२) बेपत्ता आहे. विजय बामणीया (३५) हे पोहत किनाऱ्यावर आले. मच्छीमार नौका उलटल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिल्यानंतर अग्निशमन दल, पोलीस, नौदल आणि महापालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

स्थानिक मासेमारी नौका आणि दोरीच्या मदतीने जीवरक्षकांमार्फत बेपत्ता मच्छीमाराचा शोध घेण्यात आला. मात्र, मदतकार्य करणाऱ्यांना यश मिळाले नाही. अखेर हूक अँकर आणि हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. भरतीमुळे रविवारी दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी शोधमोहीम थांबवण्यात आली. सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास जुहू चौपाटी येथे विनोद गोयल यांचा मृतदेह आढळला. उस्मानी भंडारी बेपत्ता असल्याचे अग्निशमन नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. एकजण बचावला, तिसरा बेपत्ता