भिवंडीत दहीहंडी बांधताना एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजच्या दहीहंडीला उत्सवाला गालबोट लागल्याचे चित्र आहे.
गणेश अनंत पाटील (२९) असे मृत पावलेल्या गोविंदाचे नाव आहे. दहीहंडी बांधतांना खांब डोक्यावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. गणेश हा दिघाशी या गावाचा रहिवासी असून त्याचे नुकतेच लग्न झाले होते. दरम्यान, शहरातील विविध भागांमध्ये आतापर्यंत ३५ गोविंदा जखमी झाले आहेत. जखमी गोविंदांना नायर, केईएम, राजावाडी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेल्या या गोविंदामध्ये कोणीही गंभीर जखमी झाले नसल्याचे रुग्णलयाकडून सांगण्यात आले आहे.

Story img Loader